मुंबईत टीव्ही कलाकार राहुल दीक्षितची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईमध्ये टीव्ही कलाकार राहुल दीक्षितने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली. 28 वर्षीय राहुल मालिकांमध्ये काम करत होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याने नक्की आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचा पोलीस शोध घेत आहेत.