ट्विटरने पुन्हा रोखली ब्लू टिकची प्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटरने पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी ब्लू टिक देण्याची प्रक्रिया काही काळ थांबवली आहे. यामुळे ऑप्लिकेशन आणि रिव्ह्यू प्रोसेसला देण्याचे काम केले जाईल, असे स्पष्टीकरण ट्विटरने दिले आहे. याआधीही कंपनीने अनेक वेळा ब्लू टिक देण्याची प्रक्रिया थांबवली होती.

ब्लू टिकसाठी अप्लाय करण्यास युजर्सना काही आठवडे किंवा काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. लवकरच ही सेवा सुरू केली जाईल, असे ट्विटरने सांगितले आहे. युजर्सच्या संयमाचे कौतुक करून ही समस्या लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करू. ऑप्लिकेशन आणि रिव्ह्यू प्रोसेसमध्ये काही सुधारणा करायच्या आहेत, जेणेकरून ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यास अधिकाधिक लोकांना ब्ल्यू टिकसाठी अप्लाय करण्याचा पर्याय मिळेल, असे ट्विटरने म्हटले आहे. ही प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत ट्विटरने कोणतीही तारीख सांगितलेली नाही.