हत्येचा प्रयत्न करणारे दोन फरार आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर येथील घोडेगाव, ता.नेवासा येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करुन हत्येचा प्रयत्न करणारे दोन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शोखेने जेरबंद केले आहे. आरोपीमध्ये प्रताप यलप्पा फुलमाळी (वय- 25, रा. घोडेगाव, ता.नेवासा), सचिन उर्फ बप्पा साहेबा फुलमाळी ( वय- 29, रा. घोडेगाव, ता.नेवासा) असे आहेत.

मंगळवारी फिर्यादी  सचिन गोरख कुर्‍हाडे ( वय- 27 ,रा. घोडेगांव, ता. नेवासा) हे घोडेगाब, ता.नेवासा येथे नगर-संभाजीनगर रोडवर हॉटेल गुडलकजवळ थांबले असताना आरोपी कृष्णा यलप्पा माळी व त्याचे साथीदारांनी फिर्यादीवर गावठी कट्ट्याने गोळीबार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपींचा शोध घेवून आरोपी भारत सोपान कापसे (वय- 23 , रा. कांगोणी, ता. नेवासा) यांस गुन्ह्यात वापरलेल्या गाबठी कट्ट्यासह ताब्यात घेवून सोनई पोलिसात हजर केलेले आहे. गुन्हा दाखल आरोपी प्रताप फुलमाळी व बप्पा फुलमाळी पसार झाले होते. फरार आरोपी प्रताप फुलमाळी आणि बप्पा फुलमाळी हे दोघे इमामपूर घाटातील मारुती मंदीराजजळ आले आहेत,  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ताताडीने कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले. आरोपी पळून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदोप पाटोल, पोना. दिगंबर कारखेले, मल्लिकार्जून बनकर, रविन्द्र कर्डीले, भागीनाथ पंचमूख, योगेश सातपूते, बबन बेरड अशांनी मिळून इमामपूर घाट येथे जाऊन कावाई केली.