कराड – साळींदर शिकार प्रकरणी दोन आरोपींना अटक

629

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मधील बामणोली परिक्षेत्रातील वलवण नियतक्षेत्रात फासा लावून साळींदर या अनुसूची 4 मधील वन्यप्राण्याची शिकार झाल्याच्या गुप्त बातमीवरून महादेव कोंडीराम जाधव व पांडुरंग महादेव जाधव (रा. उगवतीवाडी, वलवण) या संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 27, 29 अन्वये 12 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

13 ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांचे समोर आरोपींना हजर केले असता पाच दिवसाची वनकोठडी मिळाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई स.व्या.रा. कोल्हापूर स्थित कराडचे उपसंचालक एम.एन. मोहिते, कोयनाचे सहा. वनसंरक्षक एस.सी. साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली बामणोलीचे वनक्षेत्रपाल बी.डी. हसबनिस, वनपाल एस.एस. कुंभार, वनरक्षक एस. एस. शेंडगे, ए. बी. सावंत, सुमित चौगुले, आर. व्ही. वाघावळे, आर. एस. आवारे यांनी केली.

वलवण सदर बीटमध्ये ज्यांनी ही शिकार व शिकारी शोधून काढले ते वनरक्षक स्वप्नील शेंडगेअभियंता व MBA असून ते वळवण सारख्या अतिदुर्गम नियतक्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. शिकारी बाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागास माहिती कळवावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व बक्षीस ही दिले जाईल असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या