रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लुटमार करणारी टोळी जेरबंद

722

रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहन चालकांना मारहाण करुन लुटमार करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहेत. भाऊसाहेब उत्तम महानवर (वय 30, रा.पाटेगांव,ता.कर्जत), अनिल नामदेव माने (वय 24, रा.माही जळगांव, ता.कर्जत) अशी आरोपींची नावे आहे. सद्दाम सलीम शेख ( वय- 24 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. जयनगर, पो. मकतपूर, जि- कोडरमा, राज्य- झारखंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती.

नगर- सोलापूर रोडने ट्रक नं. डब्ल्युबी-11-डी-3674 सांगोला येथे द्राक्षे आणण्यासाठी घेवून जात असताना पाटेवाडी शिवारात ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्याचे कडेला लावण्यात आला. यावेळी चार अनोळखी इसमांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन ट्रकच्या काचा फोडून रोख रक्कम, मोबाईल, आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा एकूण 6,700 रुपयांता ऐवज बळजबरीने चोरुन नेता. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या