
लसीकरण मोहिमेदरम्यान आरोग्यसेविकेला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या दोघींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. हीना शेख आणि शिरीन शेख अशी त्या दोघींची नावे आहेत. त्या दोघींना न्यायालयात कोठडी सुनावली आहे. तक्रारदार या महापालिकेत परिचारिका म्हणून काम करतात. सध्या त्यांची नेमणूक जोगेश्वरी येथील आरोग्य केंद्रात होती. 24 मार्च 2021 ला त्या आरोग्य केंद्रात लसीकरण करत होत्या. तेव्हा तेथे दोन महिला आल्या. कोविड अहवालावरून त्या दोघींनी तक्रारदार यांच्याशी वाद घातला. त्या दोघींनी तक्रारदारांना शिवीगाळ करून मारहाण केली. घडल्याप्रकरणी तक्रारदारांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी हीना आणि शिरीनला जोगेश्वरी परिसरातून अटक केली.


























































