
पावसात रेनकोट घालून चोऱया करणाऱया दुकलीला अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. दाऊद बेग आणि शमशुल खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
अंधेरी-कुर्ला रोड येथे एक प्लायवूडच्या दुकानात सात दिवसांपूर्वी अज्ञात चोरटय़ाने घरपह्डी करून काही रक्कम घेऊन पळ काढला होता. घरपह्डीप्रकरणी दुकानाच्या मालकाने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. उपनिरीक्षक अमित यादव याच्या पथकातील सूरनर, कांबळे, जाधव, बाबर, पाटील, टस्के, मिसाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता फुटेजमध्ये चोरटे दिसले. ते दोघे एक्प्रेस पकडून उत्तर प्रदेशला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी झांसी येथे जाऊन दाऊद आणि शमशुलला ताब्यात घेऊन अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्यांनी घरपह्डीची कबुली दिली. ते दोघे खासकरून पावसात चोऱया करतात. सीसीटीव्ही नसलेल्या दुकानाबाहेर ते रेनकोट घालून झोपतात. संधी मिळताच पहाटे दुकान साफ करून ते मुंब्रा येथे पसार व्हायचे. रेनकोट घातल्याने पोलिसांना ओळखता येणार नाही असे त्यांना वाटत होते. दाऊद आणि शमशुलकडून पोलिसांनी घरपह्डीचे साहित्य, 8 मोबाईल, लॅपटॉप जप्त केले आहेत. दाऊद आणि शमशुल हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशच्या झांसी येथील रहिवासी आहेत. पॅटरिंग कामादरम्यान त्यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघे नशेसाठी चोऱया करू लागले. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते सतत जागा बदलून राहत होते.
























































