गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना हवाई गुप्तचर विभाग (एआययू) ने अटक केली. मोहित तिवारी आणि खान मोहम्मद अयुब अशी त्या दोघांची नावे आहेत. तिवारी हा डिलिव्हरी बॉय आहे. त्या दोघांकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे कोट्यवधी रुपये इतकी आहे. खान मोहम्मद आयुब हा मालाडचा रहिवासी आहे. शनिवारी रात्री खान हा बँकॉक येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्याकडून 3458 ग्रॅम गांजा जप्त केला, तर तिवारीकडून 4864 ग्रॅम गांजा जप्त केला. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.