घरात घुसून वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना अटक

593

कोतवडे धामिलेवाडी येथे राहणाऱ्या वृद्घ महिलेच्या घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत. प्रतिभा परशूरात शिवलकर (68) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबरला रात्री आठच्या दरम्यान धामिलेवाडीतील प्रतिभा शिवलकर यांच्या घरात दोन अज्ञात इसमांनी घुसून, सुरीचा धाक दाखवून गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबदरदस्ती ओढून नेते होते. प्रतिभा शिवलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी एक पथक तयार केले होते. पोलिसांना गोपनिय माहितीच्या आधारे आरे येथे रहाणारे राम दत्ताराम शिवलकर (51) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन राजेश मधूसुदन गुरव (रा. मुंबई) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी तात्काळ एक पथक तयार करुन ठाणे व मुंबई येथे रवाना केले. त्या पथकाने राजेश मधूसुदन गुरवला मुंबई येथे ताब्यात घेतलेले आहे. राजेश मधूसुदन गुरव याने चौकशीमध्ये गुन्ह्याची कबुली देवून राम दत्ताराम शिवलकर याच्या मदतीने मंगळसुत्र चोरुन नेल्याची कबुली दिलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या