पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दुधपुरी शिवारातील दलसिंग राठोड यांच्या शेत तळ्यात गी घडना घडली. सिध्देश्वर रामकिसन धांडे (16) व शुभम कल्याण पाटोळे (14) अशी मृतांची नावे आहेत.

सिध्देश्वर हा इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर शुभम हा गावातील शाळेत इयत्ता 8 वीमध्ये शिक्षण घेत होता. काल शनिवारी सिध्देश्वर व शुभम हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरातून सायकल घेऊन कोठे तरी निघून गेले. त्यांच्या नातेवाईकांना सिध्देश्वर हा शुभमच्या घरी असेल आणि शुभम हा सिध्देश्वर याच्या घरी असेल असे वाटले.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी एकमेकांकडे विचारणा केली. मात्र मुले दिसून न आल्याने दोघांची शोधाशोध करण्यात आली. अखेर गावातील दलसिंग राठोड यांच्या शेत तळ्याजवळ त्यांची सायकल दिसून आली. शेततळ्यात पाहणी केली असता सिध्देश्वर धांडे व शुभम पाटोळे या दोन मित्रांचे प्रेत पाण्यावर तरंगताना मिळून आले. सदर घटणेचे माहिती अंबड पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांच्यासह पथकाने धाव घेतली. पंचनामा करुन त्या दोघांचे प्रेत शवविच्छेदन करणे कामी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल केले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.