डिलिव्हरी बॉयचे अपहरण, दोन पोलिसांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून 10 हजार अमेरिकन डॉलर लुटल्याच्या आरोपाखाली दोन पोलिसांना जुहू पोलिसांनी अटक केली. संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत अशी त्या दोन पोलिसांची नावे आहेत. त्या दोघांना निलंबित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर या गुन्ह्यात तीन जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तक्रारदार हा बीकेसी येथील एका पंपनीत काम करतो. त्याची पंपनी फॉरेक्स (परकीय चलन)चे काम करते. बुधवारी दुपारी तो एका ग्राहकाला ते चलन देण्यासाठी जुहू येथे गेला होता. तेथे शिंदे आणि राजपूत यांच्यासह पाच जण आले. त्याने तक्रारदार याचे अपहरण केले. त्याला दहिसर येथे घेऊन गेले. तेथे नेऊन त्याला लुटले. तिथे सुरू असलेला गोंधळ पाहून गस्तीवर असलेल्या दहिसर पोलिसांनी शिंदेला ताब्यात घेतले. त्यानंतर चौघे पळून गेले. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून शिंदेला अटक केली.