परळी उड्डाण पुलावर अपघातांचे सत्र सुरुच, दोन जणांनी गमावला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी शहरातील शामप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. धुळवडीच्या दिवशी पहाटे 3 च्या सुमारास अँटोच व टिप्परमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातातही एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता.उड्डाण पुलावर नेहमीच होत असलेले अपघात आता चिंतेची बाब झाली आहे.

मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उड्डालपुलावर शहराच्या दिशेने ॲटोरिक्षा येत असताना उड्डाण पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात टिप्परने ॲटोरिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेत अँटोचालक राजेश सखाराम पोटभरे (वय 25) याचा जाग्यावर मृत्यू झाला तर अशिष ताटे गंभीर जखमी झाला, जखमी अशिष ताटे यास उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथील शासकीय दवाखान्यात भरती करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अँटोला भरदाव धडकून अज्ञात टिप्पर गायब झाले आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत शामप्रसाद मुखर्जी उड्डालपुलावर या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.