
बिहारमध्ये आज नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी शपथ घेणार आहे. नितिश कुमार जरी मुख्यमंत्री होणार असले तरी आगामी मंत्रिमंडळात भाजपचाच दबदबा असणार आहे. बिहारला दोन उपमुख्यमंत्री मिळणार असून विधानसभेचे अध्यक्षपदही भाजपच्या खात्यात असणार आहे.
काल रात्री उशिरा भाजप आणि जदयुच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात मंत्रिमंडळा बाबत चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार तारकिशोर प्रसाद आणि रेणु यादव उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. आतापर्यंत सुशील मोदीच उपमुख्यमंत्री होते.
निश्चित रूप से ऐसे संकेत हैं कि मैं और रेणु जी (भाजपा नेता रेणु देवी) बिहार उप मुख्यमंत्री के रूप में शपथ लेंगे: भाजपा नेता तारकिशोर प्रसाद pic.twitter.com/k9Ulot2jWC
— ANI_HindiNews (@AHindinews) November 16, 2020
2015 साली नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यांच्या राजदसोबत युती केली होती. 2017 साली कुमार पुन्हा भाजपसोबत आले तेव्हा सुशील कुमार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले होते. सुशील कुमार मोदी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी एनडीची बैठक पार पाडली. त्यात नितीश कुमार एनडीएचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली. नितीश कुमार यांन राजीनामा दिला असून आज साडे चार वाजता त्यांचा शपथविधी आहे. नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.


























































