निफाड तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

18
suicide

सामना प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठ महिन्यात एकटय़ा निफाड तालुक्यात 11 शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. खडकमाळेगाव येथील 39 वर्षीय शशीकांत पंडित भोसले यांनी 14 ऑगस्टला राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. खडकमाळेगाव येथे गट क्रमांक 645 मध्ये त्यांच्या आजीच्या नावे 45 आर शेतजमीन आहे.

दुसरी घटना ओढा रेल्वे स्टेशनजवळ घडली. नांदुर्डी येथील योगेश भरत खैरे (30) यांनी सोमवारी, 20 ऑगस्टला रात्री 8 वाजता ओढा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांच्या नावे नांदुर्डी येथे गट क्रमांक 669 मध्ये 2 हेक्टर 97 आर सामाईक शेतजमीन आहे, अशी माहिती निफाड तहसील सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या