
वीज चोरीच्या धंद्यातील वादातून एका 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्या प्रकरणात न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेप व 11 लाख 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
करीम चौधरी (27) या तरुणाची बेकायदेशीर धंद्यातील वादातून साबिर सय्यद आणि जैद शेख या दोघांनी हत्या केली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात हत्या व भादंविच्या अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायालय 25 येथे या प्रकरणाचा खटला दाखल होता. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी या गुह्याचा अचूक तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. त्या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने शिक्षा सुनावली.




























































