सवा दोन लाख भाविकांनी घेतले केदारनाथचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेनिमित्त यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. केदारनाथ बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागत असून आतापर्यंत तब्बल 2.26 लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे. गंगोत्री, यमुनोत्रीमध्ये 64 आणि 65 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे, तर बद्रीनाथ धामचे 7 दिवसांत 98 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. म्हणजेच सर्वात जास्त भाविक केदारनाथला पोहोचले आहेत.