
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. 15 दिवसांपूर्वीच दोघेही अमेरिकेला गेले होते. यापैकी एक विद्यार्थी तेलंगणाचा तर दुसरा आंध्र प्रदेशचा आहे.
तेलंगणातील गट्टू दिनेश आणि आंध्रातील निकेश हे दोघे 15 दिवसांपूर्वीच शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. कनेक्टिकटच्या सॅक्रेड हार्ट विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला होता. रविवारी दिनेशचे मित्र त्याच्या खोलीत गेले, तेव्हा त्यांना दोघेही झोपलेले दिसले. मित्रांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु, ते न उठल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दोघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अमेरिकी पोलिसांनी ही माहिती दोघांच्याही कुटुंबांना कळवली असून, दिनेशचे कुटुंब तत्काळ अमेरिकेला रवाना झाले आहे.


























































