Ladakh Avalanche – लडाखमधील झोजिला खिंडीत हिमस्खलन, दोघांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमधील झोजिला खिंडीतील झिरो पॉइंट परिसरात शुक्रवारी हिमस्खलन झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमस्खलनामुळे बर्फाखाली 5 वाहने गाडली गेली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडलेली ही वाहने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरहून कारगिलच्या दिशेने निघाली होती. घटनास्थळी गांदरबल पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी बर्फाखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी संयुक्तपणे बचावकार्य राबवत आहेत.