
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फायदा सुमारे बारा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होईल. मात्र सरकारी तिजोरीवर सुमारे 1 हजार 700 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. राज्य सरकारने 1 जानेवारी 2025पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ मिळेल. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका झाला असून 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत महागाई भत्त्यासह वाढीव भत्ता ऑगस्ट 2025 या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने दिला जाणार आहे.