नगर- संभाजीनगर महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

552

नगर संभाजीनगर महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात रात्री महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. उल्हास कचरू इंगोले (वय 35, रा.सोनखास, जि.वाशीम) व परसराम तुकाराम काजळे (वय 61, रा.धनगरपुरा, जि. वाशीम) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

एका खाजगी वाहनातून पुणे येथील भिडेवाड्यावरील मशाल मोर्चासाठी भीमराव मंडळीकर, भास्कर साहेबराव मुळे, संतोष दिनकरराव काळे, राहुल अंबादास राऊत, मंगल जयराम लबडे, वाहन चालक सुभाष दौलत चंदनशिवे, भिमराव उल्हास कचरू इंगोले,परसराम तुकाराम काजळे हे गेले होते. कार्यक्रमानंतर परतत असताना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उल्हास कचरू इंगोले, परसराम तुकाराम काजळे हे दोघे लघुशंकेसाठी महामार्ग ओलांडून पलिकडच्या बाजूला जात होते. यावेळी नगरकडून संभाजीनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एस.टी. बसने या दोघांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून एस.टी.बसचालक भाऊसाहेब संताराम थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या