छत्तीसगडमध्ये दोन साध्वींवर सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगडच्या पेंद्रमध्ये दोन साध्वींवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २ मार्च रोजी चार पुरुषांनी साध्वींवर बलात्कार करून एका कॉन्ट्रक्ट किलरकडे त्यांना पुन्हा एकदा बलात्कार तसेच हत्या करण्यासाठी सोपवलं. मात्र त्या गुंडाला साध्वींची दया आली आणि त्याने त्यांची त्याच्याच तावडीतून सुटका केली.

या साध्वींनी राज्याचे मुख्यमंत्री रमन सिंह यांना याबाबतचे एक पत्र लिहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सर्वांसमोर आले. साध्वींनी पत्रामध्ये याबाबत कोणालाही काही सांगणार नाही या अटीवर गुंडाने त्याची सुटका केल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याआधी साधारण दोन महिन्यांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.