
कश्मीरमधील कुलगाम जिह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हिंदुस्थानी सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. तर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले.
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने ‘ऑपरेशन गुडार’ नावाने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. लष्कराने घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यात लष्कराचे तीन जवान गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.