
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला असून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना दक्षिणपूर्व दिल्लीतील सराय काळे खान भागातून अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून दोन अॅटोमॅटिक पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे.
पोलीस उपायुक्त (विशेष सेल) संजीव कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिनियम पार्कजवळ सराई काळे खानजवळ दहशतवादी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री सव्वादहाच्या सुमारास सापळा रचण्यात आला.
यात जम्मू-कश्मीरमधली रहिवासी असलेलया दोघा दहशतवाद्यांना पकडण्यात आले. अब्दुल लतीफ मीर (12) हा बारामुल्ला जिल्हयातील डोर गावचा रहिवासी आहे, तर अश्रफ खटाना (20) हा जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिह्यातील हातमुल्ला गावात राहणारा रहिवासी आहे.त्यांच्याकडून दोन अॅटोमेटिक पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.























































