पुलवामात एनकाऊंटरदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि सैनिकांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैनिकांना यश आले आहे. यात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या भागात शोध मोहीम सुरू आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कश्मीरमधील अवंतीपुरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सीआरपीएफचे काही जवान आणि पोलीस या भागात पोहोचले. सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम राबवली. तेव्हा काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. तेव्हा सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. रात्रभर चकमक सुरू होती. सोमवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आले. यात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  दोन्ही दहशतवादी लश्कर ए तैय्यबाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या