
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरच्या हिंदवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर सुरक्षा दलाचे पाच जण शहीद झाले आहेत.
#UPDATE Handwara encounter: Two terrorists have been killed, operation in progress. Five security personnel have lost their lives in the encounter which has been going on for the last three days. #JammuAndKashmir pic.twitter.com/fAExyhOjvO
— ANI (@ANI) March 3, 2019
गेल्या तीन दिवसांपासून ही चकमक सुरू आहे. तिसर्या दिवशी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. यात चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान आणि एक जम्मू कश्मीर पोली दलाती अधिकारी जवान शहीद झाले होते. सकाळी पुन्हा दोन जण शहीद झाल्याचे वृत्त आहे. अजूनही ही चकमक सुरू असून सुरक्षा दल दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत.
























































