जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याने शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

सोपोर जिल्ह्यातील द्रुसु गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी गुरुवारी रात्री लष्कराला दिली होती. त्यानंतर या गावात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहीमेदरम्यान जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

हे दोन्ही दहशतवादी स्थानिक असून एक पुलवामा जिल्ह्याचा तर दुसरा सोपोर जिल्ह्याचा रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी पुलवामा येथून बेपत्ता झालेला आणि नंतर दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झालेला तरुण या चकमकीत मारला गेल्याचे बोलले जात आहे.

summary : Two terrorists have been gunned down by security forces in sopore