
मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले रस्ते, त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी शिगा, निकृष्ट बांधकाम, रस्त्यांचा असमान पृष्ठभाग, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, रस्त्यावरील मोकाट जनावरे, तीव्र उतार आणि वक्राकार रस्ते, बेशिस्त वाहनचालक, वळणावर धोकादायक ओव्हरटेकिंग या कारणांमुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा झाल्याचा अहवाल रायगडमधील एका तरुणाने राज्य सरकारला सादर केला आहे.
रायगडच्या पेणमधील पाटणी कासू गावातील चैतन्य पाटील या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरने मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) हे सुमारे 490 किमीचे अंतर 29 दिवसात पायी पार केले आणि या राष्ट्रीय महामार्ग एनएच 66 वर आढळेल्या त्रुटी आणि शिफारसींचा सुमारे साठ पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांपासून परिवहन मंत्री, सचिव आणि कोकणातील सर्वपक्षीय आमदारांना सादर केला आहे. गेल्या दहा अकरा वर्षांत दोन हजारांहून अधिक लोकांचा या महामार्गावर मृत्यु झाल्याची यामध्ये आकडेवारी आहे.
महामार्गावरील त्रुटी
दिशादर्शक फलकांचा अभाव गावांमध्ये सर्व्हिस रोडचा अभाव रस्त्यांवरील अंडरपासमध्ये गळती डोंगरावरून कोसळणारी माती-दगड-झाडे संरक्षक भिंतीच्या मागील पाण्याच्या निचऱ्याचा अभाव गावांना जोडणारे रस्ते अपूर्ण-निकृष्ट दर्जाचे रस्त्यांवरील दिव्यांच्या देखभालीचा अभाव.






























































