श्रींगोद्यात दुचोकी चोरांची टोळी गजाआड, 17 दुचाक्या जप्त

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

श्रीगोंदे शहरासह तालुक्यात आणि शेजारच्या तालुक्यात देखील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असताना श्रीगोंदे पोलिसांनी दुचाकी चोरीच्या टोळीचा छडा लावत या टोळीचकडून तब्ब्ल 17 मोटारसायकली जप्त केल्या आणि सहा आरोपी गजाआड केले. या सर्व दुचाकी गाड्या हिरो होंडा स्प्लेंडर याच कंपनीच्या असल्याने ही टोळी केवळ याच गाड्याच्या चोरीकरून आलेल्या पैशातून मौजमजा करत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव आणि पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.