
भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मुलगा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हा मुलगा आपल्या घराच्या बाहेरील अंगणात खेळत होता, तर त्याची आई घरात चहा बनवत होती. याच वेळी भटक्या कुत्र्यांच्या कळपाने मुलावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी मुलाला फरफटत नेले. मुलाचा आवाज ऐकून त्याची आई घराबाहेर आली. कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


























































