
मेडीकलवाल्याने चुकीचे औषध दिल्याने एका दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिल्लीतील शहादरा जीटीबी भागात एका बालिकेला सर्दी खोकला झाला होता. आईने मेडिकलमधून तिच्यासाठी औषध आणले होते. परंतु त्या औषधानेनी मुलीला गुण नाही आला. तेव्हा मेडिकलवाल्याने बालिकेला एक इंजेक्षन दिले. मुलीला घरी आल्यानंतर तिने रक्ताची उलटी केली. तेव्हा आईने बाळाला जीटीबी इस्पितळात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

























































