
सामना प्रतिनिधी । अलिबाग
मुरूड तालुक्यातील फणसाड धरणात रोहा तालुक्यातील सारसोली येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही बुडालेल्या युवकांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
रोहा तालुक्यातील सारसोली येथील काही तरुण मौजमजा करण्यासाठी फणसाड धरणावर आले होते. यावेळी फणसाड धरणात पोहण्यासाठी हे तरुण उतरले होते. त्यावेळी या दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागले.
यावेळी या दोन तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत अलेल्यानी केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. याबाबत मुरुड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.






























































