ओव्हरटेक करताना दुचाकींच्या धडकेत दोन तरूण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दोन्ही तरूण दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास वानवडी परिसरातील भैरोबानाला पेट्रोलपंपासमोर घडला. मोहम्मद कैफ मोसीन शेख वय 20 रा. हडपसर, आणि प्रसाद रामकृष्ण राजम वय 26 रा. वानवडी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

शहरातील भैरोबानाला परिसरातून काल रात्री सव्वा आठच्या सुमारास दोन्ही दुचाकीस्वार शेख आणि राजम चालले होते. त्यावेळी राजम याने वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत वेगात दुचाकी चालविली. त्यानंतर शेख यांना धडक देऊन दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.