
सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे एका उबर चालकाला चक्क आपली नोकरी गमवावी लागली आहे. श्रीकांत हा उबरचालक तिरुपतीला दर्शनासाठी गेला होता. तिथे त्याने मुंडण केले. परतल्यानंतर श्रीकांतने नेहमीप्रमाणे उबरच्या ऍपवर लॉगइन केले, परंतु मुंडण केल्यामुळे ऍपवर त्याच्या चेहऱयाची ओळख पटेना. वारंवार लॉगइन केल्याने ऍपवरून त्याला ब्लॉक केले.
श्रीकांतने कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्यामुळे त्याला बॅन केल्याचे स्पष्टीकरण उबरने दिले आहे. त्यावर तेलंगणा टॅक्सी असोसिएशनच्या शेख सलालुद्दीन यांनी म्हटलेय, श्रीकांत हा उबरला दीड वर्षापासून काम करतोय. त्याला 4.67 रेटिंग असूनही उबरने त्याला ब्लॉक केले आहे.

























































