उदय बने सलग सहाव्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याच्या उंबरठ्यावर, शिवसैनिकांनी कंबर कसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोळप जिल्हा परिषद गटात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार उदय बने यांना प्रचारात पाठिंबा मिळत आहे.सलग सहाव्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याचा विक्रम करण्यासाठी उदय बने सज्ज झाले आहेत.

उदय बने यांनी गोळप जिल्हा परिषद गटातूनच जिल्हा परिषद सदस्य पदाची कारकीर्द सुरू केली होती.गेली २५ वर्ष ते शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.त्यांनी बांधकाम सभापती,शिक्षण सभापती.उपाध्यक्ष आणि प्रभारी अध्यक्षपद सांभाळले आहे.उदय बने घरोघरी प्रचार करत आहेत.गोळप पंचायत समिती गणातून अविनाश गुरव आणि भाट्ये गणातील किरण नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.विभागप्रमुख प्रकाश साळवी मेहनत घेत आहेत.