महिनाभरात बसस्थानकाच्या कामात प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई, उदय सामंत यांचा इशारा

957

रत्नागिरी एस.टी. बस स्थानकाचे काम गेले अनेक दिवस रेंगाळलेले असल्यामुळे रविवारी सकाळी साडे सात वाजता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बस स्थानकाच्या कामाची पाहणी करत संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. एक महिन्यात कामाची प्रगती दिसली नाही तर ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.

रत्नागिरी एस.टी. बस स्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकाचे काम रेंगाळलेले असल्याच्या तक्रारी कानावर आल्यामुळे आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बस स्थानकाची पाहणी केली. संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरले. एक महिन्यात कामाची प्रगती दिसली नाही तर कारवाई करण्याचा इशारा सामंत यांनी दिला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, एस.टी.चे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहरसंघटक प्रसाद सावंत, महिला शहरसंघटक मनिषा बामणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या