LIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामलल्लांचे दर्शन घेतले

4019
 • शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सौ. रश्मीताई ठाकरे आणि युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या येथे रामलल्लांचे दर्शन घेतले.

 • भाजपचा अर्थ हिंदुत्व नाही, आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत हिंदुत्वापासून नाही
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे महाराष्ट्र भवनाच्या उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती केली
 • रामभक्तांच्या सोईसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
 • राम मंदिरासाठी शिवसेना ट्रस्ट कडून 1 कोटी रुपये देणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले
 • आज मला शरयू आरती करण्याची इच्छा होती
 • मी यापुढेही इथे येईन
 • लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानंतर मी पुन्हा इथे आलो होतो
 • नोव्हेंबर 2018 साली मी इथे आलो होतो, 2019 साली न्यायालयाने निकाल जाहीर केला
 • शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची प्रस्तावना केली
 • पत्रकार परिषदेसाठीच्या मंचावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित
 • मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
 • प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार
 • ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले
 • प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना पंचशील हॉटेलवर पोलिसांनी सलामी दिली
 • मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी सलामी दिली
 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत पोहोचले
आपली प्रतिक्रिया द्या