उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महेंद्र कदम यांचा गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

झोपडपट्टीवासीयांसह सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे उपलब्ध करून देणारा संशोधन प्रकल्प सादर करणाऱया महेंद्र कदम यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. या यशाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कदम यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईसारख्या शहरात घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून झोपडपट्टीधारकांना तर जीवनमरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे पुनर्विकासातून मिळावी यासाठी महेंद्र कदम यांनी संशोधन करून प्रबंध सादर केला आहे. झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळावीत यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 40 लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे मिळण्याची योजना प्रत्यक्षात आली. यातूनच प्रेरणा घेऊन आपण संशोधन करून प्रबंध सादर केल्याचे कदम यांनी सांगितले.

summary- uddhav thackeray honored mahendra kadam