मराठा बांधवांना पाणी, अन्न पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा, हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत. सरकार त्यांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. अशावेळी या बांधवांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आलेल्या मराठी बांधवांसाठी शिवसैनिकांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन केले. “महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे. ही संख्या हजारोंच्या घरात आहे. पाऊस, पाण्यात, चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. अशा वेळी तमाम शिवसैनिकांना माझे आवाहन आहे की या बांधवांना पाणी,अन्न, शौचालये अशा सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा, हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे! असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.