Opertion Sindoor भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम! दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानी जवानांनी बुधवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. जवानांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे देशभरातून कौतुक होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत या हल्ल्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

”भारतीय जवानांनी पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय जवान सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, असे उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले आहे.