
सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. सोमवारी आशाताईंचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे व पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आशाताईंचे अंत्यदर्शन घेतले.
#WATCH | Maharashtra | Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray, his wife Rashmi Thackeray and leader Aaditya Thackeray pay their last respects to legendary singer Asha Bhosle at her residence in Mumbai.
Asha Bhosle passed away at the age of 92 yesterday at Breach Candy Hospital in… pic.twitter.com/32Bgqarr0N
— ANI (@ANI) April 13, 2026
आशाताईंचे पार्थिव त्यांच्या लोअर परळमधील कासा ग्रँडे येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता रितेश देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले
दुपारी अंत्यसंस्कार
आशाताई यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


























































