वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शन सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांना मंडळांनी सामाजिक भाण कसं राखावं याविशयी मार्गदर्शन केलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपला देखील फटकारले. ”काल आदित्य मालवण मध्ये गेला होता. राडा करायला गेलो होता का? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडतो. दादा कोंडके यांचा एक चित्रपट होता बोट लावेन तिथे गुदगुदल्या. आता मोदी नवीन काढतायत हात लावेन तिथे सत्यानाश…. हिच यांची गॅरंटीच. जिथे हात लावणार तिथे सत्यानाश झालाच पाहिजे. अशा सडक्या गॅरंट्या आम्हाला नकोच आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
”मुंबईला सध्या कुणी वाली राहिलेला नाही. दोन वर्षांपासून महापालिका बरखास्त करून ठेवली आहे. त्यामुळे जायचं कुणाकडे लोकप्रतिनिधीच नाही. पूर्वी वॉर्डाचे प्रश्न नगसेवकांकडून वॉर्ड ऑफिसमध्ये सोडवले जायचे. त्यामुळे आता कुणाचा कुणाला वाली राहिलेला नाही. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवले जातात. तिथे विसर्जनाच्या ठिकाणी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो असतात. मला वाटतं ते सांगत आहेत की कुणाचं विसर्जन करायचं आहे. कारण गणपती बाप्पा आमच्या हृद्यात आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”मुख्यमंत्री खड्ड्यांची पाहणी करायला गेलेले. रस्त्यावर खड्डे आहेतच. यांच्या कारभाराला भ्रष्टाचाराचे खड्डे पडले आहेत तु बुजणार कसे. गणपती जवळ आले आणि आता यांना जाग आली खड्ड्याची पाहणी करायची. मग त्या नायक चित्रपटासारखं टाईपराईट घेऊन फिरत होते. आणि मग एखाद्या कंत्राटदाराच्या नावाने नोटीस काढत होते. नंतर समजतं की हा आपलाच माणूस आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना लगावला.
”टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिक स्वरुपात सुरू केला तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. त्यावेळी टिळक आणि आगरकर यांनी वासुदेव बळवंत फडकेंचं बंड बघत होतं. त्यांच्या खटल्याला देखील टिळक आगरकर बसत होते. फडके फासावर गेले. क्रांतीकारक शूराला आपण वाचवू शकलो नाही. त्यांनी ज्या देशासाठी केलं त्यांच्यामागे लोकं नाही उभी राहिली. त्यामुळे किती जणांनी फासावर जायचं असं त्यांना वाटलं. पूर्णपणे असंघटीक होतं त्यावेळी सगळीकडे सगळं विखुरलेलं आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे लोक नावाची शक्ती जागी होत नाही तोपर्यंत सर्व एकत्र येणार नाहीत. लोकमान्यांनी सणाची चळवळ केली. तिथून सुरुवात झाली. स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू केली. आज त्याचा उत्सव झाला आहे. टिळकांनी जे केलं त्या उलट नेमकं आज केलं जातंय. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केली जातेय. तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती भाजपवाले अवंलंबत आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”आपण उंच मुर्त्या बनवताना खूप काळजीपूर्वक करतो. तिची प्रतिष्ठापना झाल्यापासून विसर्जन होईपर्यंत कुठेही त्या बाप्पााच्या मुर्तीचा अवमान होणार नाही याची दक्षता आपण घेता. जशी ही जबाबदारी तुम्ही घेता तशी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची देखील घ्यायला हवी होती. एकमेकांकडे तुम्ही बोट दाखवता. नौदलाकडे, पीडब्ल्यूडी, मुर्तीकाराकडे, कंत्राटदराकडे बोट दाखवायची कामं सुरू आहेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”काल महामहीम राष्ट्रपती बोलल्या मी घाबरलेय. आता या पुढे नको. राष्ट्रपतींना संवेदना आहेत हे या प्रकराने कळलंय. मणिपूरच्या वेळी त्या बोलल्या असत्या, त्या पहिल्या घटनेच्या वेळीच त्या बोलल्या असत्या तर पुढच्या घटना घडल्या नसत्या”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“गणपती मंडळांनी सण साजरा करायचा म्हणून काम नका करू. गणपतीच्या दिवसांसाठी एक सांस्कृतिक पिठ बनवलं पाहिजे, एखाद्या मंडळात मला माझ्या मुलांना घेऊन जावंस वाटतं कारण काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तुमच्या देखाव्यातून तुम्ही सांगू शकता. समाजासमाजामध्ये आगी लावण्याचं जे कारस्थान सुरू आहे. दंगली झाल्या तरी चालतील पण आम्हाला राज्य पाहिजे . हा नतद्रष्टपणाविरोधात जागृती करा. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबातही आपल्या देखाव्यातून सांगू शकता. माझ्या आजोबांनी शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण करताना सांगितलेलं जर आपल्या समोर एखाद्या माझ्या माता भगिणीला छेडत असेल तर त्याला ताडकन कानाखाली मारलं तर तु खरा माझा मावळा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्या काय घडत आहे. बदलापूरमध्ये जे घडलं त्या प्रकरणी आई वडिल. पोलीस स्टेशनला खेट्या घालूनही तक्रार दाखल होत नाही. तक्रार दाखल झाल्यावर तपास होत नाही. उद्रेक झाल्यावर तपास करता. त्यानंतर आंदोलनाला उतरलेल्यांवरगुन्हे दाखल करता. हीच तत्परता आरोपीवर गुन्हा दाखल करताना का नाही दाखवली. आम्हाला शक्ती कायदा पाहिजे पण आताचा कायदाही तितका सक्षम आहे. बदलापूरात मिंधेंच्या त्या नेत्याने पत्रकाराला विचारलं की तु अशा बातम्या देतेयस जसं काही तुझ्यावरच अत्याचार झाला आहे. त्याच्यावर मिंध्यांनी अजुनही कारवाई केली नाही. हे आहेत का यांचे बाळासाहेबांचे विचार. हे शिवसेनाप्रमुखांनी शिकवलेले नाही. अजुनही त्याच्यावर पक्षाची कारवाई झालेली नाही, गद्दारांनों हे बाळासाहेबांचे विचार नाहीत’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
”मंडळांना हे पैसे देत आहेत. उत्सवासाठी पैसे लागतात. पण म्हणून तुम्ही तुमचा आत्मा विकू नका . उत्सवासाठी कुणी पैसे देत असेल तर घ्या. पण गणपतीच्या जागी माझा फोटो लावा असं जर कुणी सांगितलं तर लाथ मारून हाकलून द्या. मोदीजी म्हणालेच आहेत की उपरवालेने मुझे भेजा है. मग काय उद्या य़ांची मूर्ती लावून पूजा करायची का? यांच्यासाठी आय़ुष्य़ आणि आत्मा विकू नका. गणपती हा विघ्नहर्ता आहे. माझ्या भगिणीवरच संकट निवारण करणारा विघ्नहर्ता प्रत्येकाच्या हृदयात असला पाहिजे. तुमच्या रुपातून त्यांना गणपती धावून आलेला दिसला पाहिजे. माझा बाप्पा, माझा भाऊ धावून आलेला दिसला पाहिजे”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.