
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी लातूरनंतर धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकुर या अतिवृष्टी झालेल्या भागाची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पिकासोबत शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं वास्तव डोळ्यासमोर असताना देखील निष्ठुर सरकार पंचनाम्याची वाट पाहतंय? का सरसकट मदत जाहीर केली जात नाहीय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्ही बळीराजासोबत आहोतच पण अशा परिस्थितीत सरकारनेसुद्धा खंबीर रहायला हवं ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली.
यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते.
इटकूर गावातील शिलाताई मोरे यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्या घराची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली.
बळीराजासाठी लढणार! उद्धव ठाकरे यांनी पुराचे पाणी शिरलेल्या घराची केली पाहणी #UddhavThackeray #marathwadaflood #saamanaonline pic.twitter.com/uQ1dy6h5mI
— Saamana Online (@SaamanaOnline) September 25, 2025