कॅलेंडरमधून ठाण्यातील 12 उद्योजकांची यशोगाथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
calender

तिथी, वार, जयंती, पंचांग, सार्वजनिक सुट्ट्या अशा पारंपरिक दिनदर्शिकेची चौकट मोडून ‘उद्यम ठाणे’ या संस्थेने ठाण्यातील 12 यशस्वी उद्योजकांची यशोगाथाच ‘उद्यम ठाणे’ या दिनदर्शिकेतून समोर आणली आहे. यंदा प्रथमच केलेल्या या प्रयत्नांतून ‘उद्यम’ने साकारलेल्या दिनदर्शिकेत विविध क्षेत्रांतील उद्योजकांचा प्रवास ठाणेकरांसमोर आणला आहे.

मराठी तरुणांना उद्योगधंद्याचे गणित सोडवताना ‘टक्केटोणपे’ समजणे. त्यावर मात करून उद्योगात टिकून राहण्यासाठी ही दिनदर्शिका प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे भिंतीवरी मराठी उद्योजकांची दिनदर्शिका असावी, ही संकल्पना आकाराला येणार आहे.

नवीन वर्षासोबत नवनव्या दिनदर्शिका बाजारात दाखल होतात. पंचांगासोबत विवाह मुहूर्त, रेसिपी, भविष्य, घरगुती उपाय अशा नानाविध संकल्पना या दिनदर्शिकांमध्ये दिल्या जातात. मात्र या पठडीतील दिनदर्शिका टाळून ‘उद्यम ठाणे’च्या माध्यमातून संयोजक संदीप पाचंगे यांनी उद्योजकांच्या यशस्वीतेचा आलेख मांडणारी दिनदर्शिका तयार करण्याचा चंगच बांधला. अवघ्या महिन्याभरात ठाण्यातील मराठी उद्योजकांची यशस्वीतेची कहाणी शब्दबद्ध करून या दिनदर्शिकेत मांडून त्यांनी नुकतीच प्रकाशित केली. प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभ्या असलेल्या उद्योजकांसह जगभरातील मराठी व प्रसिद्ध जागतिक उद्योजकांचा व त्यांच्या कंपन्यांचा प्रवास या दिनदर्शिकेत मांडण्यात आला आहे.

यांची सक्सेस स्टोरी

पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, सह्याद्री मेडिकल्सचे संजय धनावडे, लाइट ऍण्ड शेड्सचे संदीप वेंगुर्लेकर, सानवा मोटर्सचे संजीव मेस्त्री, आयटी क्षेत्रातील नंदकुमार पावसकर, शेअर ब्रोकिंग क्षेत्रातील श्री विधाते ग्रुपचे मनोज गुळेकर, ओझोन बायसिकलचे शैलेश घोलप, मेतकूट, काठ न घाट हॉटेलचे किरण भिडे व किरण पावसकर, शहनाई मॅरेज हॉलचे महेश चाफेकर, कस्टमाईज केकची कंपनी चालकणाऱ्या पौर्णिमा आर्ते, आयुर्वेदिक डॉ. अक्षता पंडित आणि सामाजिक कार्यकर्त्या आरती पितळे आदींची ‘सक्सेस स्टोरी’ या दिनदर्शिकेत मांडण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – 9619436552.