यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जारी, 21 फेब्रुवारीपासून परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने (यूजीसी) घेण्यात येणाऱया राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (यूजीसी नेट) वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून लवकरच या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे.

21 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान ही परीक्षा होणार असून एकूण 57 विषयांच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षेचे शहर आणि प्रवेशपत्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी यूजीसी नेटच्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी एकूण तीन तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला असून पेपर – 1 आणि पेपर – 2च्या परीक्षेत कोणताही गॅप मिळणार नाही. सर्व परीक्षा कॉम्प्युटर प्रणालीवर आधारित असणार आहेत.