अवघ्या आठ दिवसांत उजनीची पाणीपातळी दोन टक्क्यांनी वाढली

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे अवघ्या आठ दिवसांत पाणीपातळीत दोन टक्क्याने वाढ झाली आहे. उजनी धरण 2 जून रोजी वजा 22.44 टक्के होते ते आता वजा 20.55 टक्के झाले आहे. गेल्या आठ दिवसांत उजनी धरण क्षेत्रात 37 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत उजनी धरणातील मृतसाठय़ातील 22 टक्के पाण्याचा वापर झाला होता. आठ दिवसांत पडलेल्या पावसामुळे दोन टक्के धरण भरून निघाले आहे. धरणात सध्या 52 टीएमसी पाणीसाठा असून, मृतसाठय़ातून धरण उपयुक्त पातळीत येण्यासाठी 11 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने धरणातून अन्य प्रकल्पांत पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या