लहानग्यांच्या ‘उज्ज्वल’ भविष्यासाठी ‘उज्जीवन’चा पुढाकार, पाथर्डीत अंगणवाडीची उभारणी

उज्जीवन शेडय़ुल्ड बँकेने नाशिकजवळील पाथर्डी येथील अंगणवाडीला स्वतंत्र जागा नसल्याने भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेत सव्वासहा लाख रुपये खर्चून स्वतंत्र खोली उभारली. शिक्षण हाच मुलांच्या भविष्याचा खरा आधार असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. येथे आवश्यक फर्निचरची व्यवस्था करीत लहान मुलांच्या या वर्गाची त्यांनी आकर्षक सजावट करून दिली आहे.

उज्जीवन बँकेचे व्यवस्थापन आपला ग्राहक वर्ग असलेल्या भागातील अडचणी सोडवण्यावर भर देत आहे. मागील वर्षी ग्राहक आणि कर्मचाऱयांच्या समितीच्या बैठकीत पाथर्डी भागातील महापालिका शाळा आवारात भरणाऱया अंगणवाडीला स्वतंत्र जागा नसल्याचे समोर आले. तेथे गोरगरीब पुटुंबातील 151 मुले आहेत. बँकेने परिणाम फाऊंडेशनच्या सहकार्याने’छोटे कदम’उपक्रमांतर्गत या अंगणवाडीसाठी वर्गखोली बांधून देण्याचा निर्णय घेतला. रितसर महापालिकेकडून परवानगी घेत बँकेने सवासहा लाख रुपये खर्च करून शाळा आवारात छानशी वर्गखोली बांधून दिली. त्याचे उद्घाटन नुकतेच जनशिक्षण संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बँकेच्या व्यवस्थापिका कौशल्या सोनजे, समीर घाडेगावकर, तुषार खिरपूरकर यांच्यासह मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. शाळेच्या भिंतींची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दहा वर्षात या बँकेने शहरातील अनेक अंगणवाडयांनाशैक्षणिक साहित्याची मदत केली. काहींचे नूतनीकरण केले.

आपली प्रतिक्रिया द्या