
हिंदुस्थानात सत्ताधाऱयांनी राजकीय हेतूने मतदार याद्यांना चाळणी लावल्याचा आरोप होत असताना पुढारलेल्या ब्रिटनमध्ये मतदारवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 16 व्या वर्षापासून मतदानास परवानगी देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे.
ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी ही माहिती दिली. जास्तीत जास्त नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेता यावा हा आमचा उद्देश आहे. तरुण मुले नोकऱया करतात, टॅक्स भरतात आणि लष्करात सेवाही बजावतात. या माध्यमातून ते देशाच्या विकासात योगदान देत आहेत. त्यामुळे देशातील धोरणात्मक विषयांवर मत मांडण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, असे रेनर म्हणाल्या.
बँकेचे कार्डही मतदार पुरावा म्हणून चालणार
बँकेचे कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र व डिजिटल प्रतींचाही मतदार ओळखपत्रांमध्ये समावेश केला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या देणग्यांवरही निर्बंध घातले जाणार आहेत.