
युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोनहल्ला केला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी ही माहिती दिली. ‘युक्रेनने पुतीन यांच्या नोव्हगोरोड प्रदेशातील निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 28 आणि 29 डिसेंबर रोजी युक्रेनने पुतीन यांच्या निवासस्थानावर लांब पल्ल्याचे 91 ड्रोन डागले. रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले उधळून लावले, असे लावरोव्ह म्हणाले. युक्रेनच्या या कृत्यामुळे आता शांतता चर्चेबाबत फेरविचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.





























































