युक्रेनचा रशियाला मोठा धक्का, मॉस्कोजवळील कोल्टसेव्हॉय पाइपलाइनवर केला हल्ला

रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. यातच आता युक्रेनच्या सैन्याने रशियाला मोठा धक्का दिला आहे. युक्रेनने मॉस्कोजवळील रशियाच्या सर्वात महत्त्वाच्या इंधन पाइपलाइनवर हल्ला केला आहे.

युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने शनिवारी दावा केला आहे की, शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मॉस्कोमधील रशियन सैन्याला पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या इंधन पाइपलाइनला युक्रेनियन सैन्याने लक्ष्य केले आहे. रशिया युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची मोहीम सुरू ठेवत असताना हा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्त्सेवॉय पाइपलाइन, ज्याला मॉस्को रिंग पाइपलाइन असेही म्हणतात, ही रशियामधील एक महत्त्वाची तेल उत्पादन पाइपलाइन नेटवर्क आहे. ती वायव्य रशियामध्ये स्थित आहे, ज्याची एकूण लांबी सुमारे ४०० किलोमीटर आहे.