उल्हासनगरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांवर हातोडा पडणार

35

सामना प्रतिनिधी, उल्हासनगर

व्यापाऱ्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळतानाच उल्हासनगरात रस्ते किकासात आड येणाऱ्या बांधकामांवर हातोडा टाकण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कल्याण-नगर महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम आता जलदगतीने मार्गी लागणार आहे.

एमएमआरडीएने कल्याण-नगर या महामार्गाचे काम हाती घेतले असून बरीच दुकाने उद्ध्वस्त करताना सेंच्युरी रेयॉन कंपनीची प्राचीन झाडेदेखील तोडून टाकली आहेत. मात्र या रोडवर असलेल्या पाच व्यापाऱ्यांनी प्रथम उच्च न्यायालयात धाव घेऊन बांधकामे तोडू नये यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळल्याकर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती.

या याचिकेकरील सुनावणीसाठी उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार मिलिंद सोनावणी हे दिल्लीला गेले होते. न्यायालयाने व्यापाऱ्यांची याचिका फेटाळताना रस्ते किकासात बाधा करणाऱ्या दुकानांना, घरांना चार आठवडय़ांच्या आत तोडण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांची जागा अधिकृत असेल त्यांना पर्यायी जागा देण्याचे आणि नसल्यास तोडण्याचे आदेशही उल्हासनगर पालिकेला दिले आहेत.

पर्यायी जागा देणार
व्यापाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या जागेची कागदपत्रे तपासली जातील. अधिकृत असल्यास पर्यायी जागा देण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अच्युत हांगे, नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांनी दिली. दरम्यान कल्याण-बदलापूर महामार्गावरील काही व्यापाऱ्यांना उच्च न्यायालयाकडून स्थगन आदेश मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन उच्च न्यायालयातील स्थगन आदेश उठकण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचे विधी अधिकारी राजा बुलानी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या